Indapur News । इंदापुरच्या राजकारणात मोठी खळबळ! शरद पवारांना बसला मोठा धक्का

Sharad Pawar

Indapur News । इंदापुरात शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी नाराज झाले, ज्यामुळे शरद पवारांनी नाराज नेत्यांची भेट घेतली. मात्र, या दौऱ्यानंतर अप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांची साथ सोडत इंदापूरच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Manoj Jarange Patil । ब्रेकिंग! मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणुकीतून माघार; उमेदवार उभा करणार नाहीत

हर्षवर्धन पाटील यांची पहिली प्रतिक्रिया लक्षवेधी ठरली. त्यांनी म्हटले की, “पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. नाराज नेत्यांच्या मनातील नाराजी काढण्याचा प्रयत्न साहेबांनी केला. विधानसभेच्या उमेदवारीमुळे कोणीतरी नाराज झाला असेल, पण सर्व नेते महाविकास आघाडीचे काम करतील.” असं ते म्हणाले.

Ajit Pawar । अजितदादांना अटक करा, राजकीय नेत्याचं थेट मोदींना पत्र; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या प्रश्नावर चर्चा करताना त्यांनी म्हटले की, “हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि वीजबिलमाफी फसवी आहे.” त्यांनी असा इशारा दिला की, लोकांचे मन सरकार बदलण्याच्या दिशेने आहे. “महाविकास आघाडीचे सरकार राज्यात शंभर टक्के येणार आहे,” असे हर्षवर्धन पाटील यांनी ठामपणे म्हटले.

Uttarakhand Accident । उत्तराखंडमध्ये प्रवाशी बसचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू

Spread the love