Uddhav Thackeray । सर्वात मोठी बातमी! ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी घेतला धक्कादायक निर्णय

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षात विधानसभा निवडणुकांच्या ऐन तोंडावर पाच नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांना पक्षातून निलंबित केले आहे.

Indapur News । इंदापुरच्या राजकारणात मोठी खळबळ! शरद पवारांना बसला मोठा धक्का

रुपेश म्हात्रे हे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख होते. त्यांनी पक्ष विरोधी कृती केल्यामुळे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, विश्वास नांदेकर (जिल्हाप्रमुख, यवतमाळ), चंद्रकांत घुगूल (झरी तालुकाप्रमुख), संजय आवारी (मारेगाव तालुकाप्रमुख), आणि प्रसाद ठाकरे (वणी तालुकाप्रमुख) यांना देखील पक्षविरोधी कृती केल्यामुळे निलंबित करण्यात आले आहे.

Ajit Pawar । अजितदादांना अटक करा, राजकीय नेत्याचं थेट मोदींना पत्र; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपेश म्हात्रे यांनी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता, पण त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. तथापि, अर्ज मागे घेतल्यानंतरही त्यांनी पक्षविरोधी वक्तव्ये केली, त्यामुळे त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली गेली.

Uttarakhand Accident । उत्तराखंडमध्ये प्रवाशी बसचा भीषण अपघात; 15 जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरे यांनी कालच पक्षातील बंडखोर नेत्यांना अर्ज मागे घेण्याची सूचना दिली होती. तरीही काही नेत्यांनी ऐकले नाही, आणि आज कारवाईला सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “जो कोणी पक्षविरोधी कृत्य करेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.” परिणामी, पाच नेत्यांना हकालपट्टी करण्याची कारवाई केली गेली आहे.

Assembly Elections | सर्वात मोठी बातमी! शरद पवारांचा उमेदवार अडचणीत? धक्कादायक आरोपाने उडाली खळबळ

Spread the love