Harshvardhan Patil । सर्वात मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीच्या तोंडावर बसला मोठा धक्का

Harshvardhan Patil

Harshvardhan Patil । इंदापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळे पक्षाच्या अंतर्गत फूट उभी राहिली आहे. हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले होते. प्रवीण माने यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर अप्पासाहेब जगदाळे यांनी महायुतीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा दिला. त्याच दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या चुलत बंधू मयूर पाटील यांनी प्रवीण माने यांना पाठींबा जाहीर केला आहे.

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? स्वतःच दिली मोठी माहिती

मयूर पाटील हे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असून, इंदापुरात त्यांचं मोठं राजकीय वर्चस्व मानलं जातं. मयूर पाटील यांच्या पाठिंब्यामुळे प्रवीण मानेच्या परिवर्तन विकास आघाडीला आणखी बळ मिळालं आहे. मयूर पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत सांगितलं की, “हर्षवर्धन पाटील यांनी सत्ता त्यांच्या मुला-मुलींच्या हातात देण्याचा विचार केला आहे. आम्ही राजकारण स्वार्थासाठी करत नाही, आम्हाला जनतेची सेवा करायची आहे.”

Bjp । सर्वात मोठी बातमी! भाजपने ४० बड्या नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी

त्यांनी आणखी स्पष्ट केलं की, हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवार लादण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्या दृष्टीने योग्य नव्हता. मयूर पाटील आणि इतर विरोधकांचा आरोप आहे की हर्षवर्धन पाटील हे भाजपसह अनेक पक्षांच्या वाटेवर चालले असून, पक्षाच्या सहकार्याच्या तत्त्वांची धिंधाण करीत आहेत.

Bjp । ब्रेकिंग! भाजपला सर्वात मोठा धक्का; माजी महिला खासदाराने दिला तडकाफडकी राजीनामा

Spread the love