Congress । सर्वात मोठी बातमी! काँग्रेस ऍक्शन मोडवर, बंडखोर नेत्यांविरोधात केली मोठी कारवाई

Congress

Congress । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने मोठ्या बंडखोर नेत्यांवर कारवाई केली आहे. पक्षाच्या आदेशांना न जुमानणाऱ्या आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करणाऱ्या नेत्यांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. कॉँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी याबाबत माहिती दिली. या निलंबित नेत्यांमध्ये रामटेक विधानसभा मतदारसंघातील राजेंद्र मुळक, काटोलमधून दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातील आबा बागुल आणि कसबा मतदारसंघातील कमल व्यवहारे यांचा समावेश आहे.

Harshvardhan Patil । सर्वात मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीच्या तोंडावर बसला मोठा धक्का

कॉँग्रेसने सांगलीतील जयश्री पाटील यांच्यावर देखील कारवाई केली आहे. जयश्री पाटील यांनी पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आणि आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग! “लाडकी बहीण योजनेचे पैसे 2100 रुपये करणार”, राष्ट्रवादीचा जाहीरनाम्यात अजित दादांचा वादा

त्याचबरोबर, भाजपने देखील 40 बंडखोरांना पक्षातून हकालपट्टी केली आहे, ज्यात 37 विधानसभा मतदारसंघातील नेत्यांचा समावेश आहे. या सर्व बंडखोरांवर पक्षविरोधी कृत्ये केल्याचा आरोप करत शिस्तभंगामुळे त्यांना पार्टीपासून वगळण्यात आले आहे.

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? स्वतःच दिली मोठी माहिती

Spread the love