Devendr Fadanvis । राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, MSP पेक्षा कमी भाव मिळाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी भावांतर योजना राबवली जाईल.
Congress । सर्वात मोठी बातमी! काँग्रेस ऍक्शन मोडवर, बंडखोर नेत्यांविरोधात केली मोठी कारवाई
फडणवीस म्हणाले, “शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेल आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध योजना राबविली जातील.” याबरोबरच, धुळे जिल्ह्याचे महत्त्व सांगताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मनमाड-इंदूर रेल्वे सेवा, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि इतर राष्ट्रीय महामार्गांमुळे धुळे एक औद्योगिक केंद्र बनेल.
फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकाही केली. “आम्ही सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन महाराष्ट्र पुढे नेत आहोत. विरोधकांना विकासाची उत्तरे देता येत नाही, म्हणून ते वोट जिहाद करतात,” असं ते म्हणाले.
Ajit Pawar | अणुशक्ती नगर आणि मानखुर्द शिवाजीनगरमध्ये अजित पवारांचा भव्य रोड शो