Politics News । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. गायकवाड यांनी दावा केला की, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीसाठी सर्व तयारी केली होती, पण त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर अचानक त्यांच्या पत्त्यावर कट मारला गेला. त्यांच्या आरोपानुसार, बुलढाणा येथील काही लोकांनी मातोश्रीवर दहा खोके पोहोचवले आणि त्यानंतर तुपकरांचा पत्ता कट करण्यात आला.
Devendr Fadanvis । ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा, ‘या’ गोष्टी देणार शेतकऱ्यांना
गायकवाड यांनी महाविकासआघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके आणि त्यांचे पती सुनील शेळके यांच्यावरही गंभीर आरोप केले. 2016 च्या नोटाबंदी दरम्यान, शेळके यांच्या बँकेमध्ये एका हजार कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचा दावा गायकवाड यांनी केला. त्यानुसार, मुंबईतील लोकांनी बँकेत नोटा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा केले होते, पण त्यातील 500 कोटी रुपये फुकट गेले, असा आरोप त्यांनी केला. यावर सुनील शेळके यांच्या नोकरीच्या बदलापासून ते त्यांना किती फायदे मिळाले, याबद्दल प्रश्न उपस्थित केले.
यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढाई होणार आहे. शिंदे गटाचे संजय गायकवाड आणि ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यात एक थेट सामना होणार आहे. गायकवाड यांच्या आरोपांनी जिल्ह्यात खळबळ माजवली असून, यामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलू शकतात.