Politics News । पुण्यातील राजकारणात सध्या एक नवा राजकीय उलटफेर होण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्या शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याचे कारण म्हणजे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कात्रजच्या सभेत केलेले एक विधान, ज्यात त्यांनी वसंत मोरे “तुम्ही आता मशाल घेतली आहे, पण आम्ही तुमच्या हातात कधीही तुतारी देऊ शकतो,” असे म्हटले. पाटील यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून, वसंत मोरे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार की नाही, यावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
mumbai pune expressway accident । मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर खाजगी बसचा अपघात, 15 जण जखमी
वसंत मोरे यांनी यावर आपले स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आता आपण मशाल घेऊन काम सुरू केले आहे, आणि आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुतारी वाजवण्याची तयारी आम्ही केलेली नाही. आमच्या प्रभागात तुतारी वाजवायची आवश्यकता नाही,” असे वसंत मोरे म्हणाले. त्यांनी सध्या महाविकास आघाडीला 100% पोषक वातावरण असल्याचा दावा केला, तसेच मुस्लिम आणि माळी समाजाचा मतदान महाविकास आघाडीला होईल, अशी माहिती दिली.
Oben Rorr EZ: इलेक्ट्रिक बाईक क्षेत्रात नवीन क्रांती, 175 किमी रेंज आणि 95 किमी/तास टॉप स्पीड
तसेच, भाजपवर टीका करत त्यांनी सांगितले की, भाजपने राजकारणाचा विचका केलाय, ज्यामुळे लोकांचा इंटरेस्ट कमी झाला आहे. मोरे यांनी हडपसर आणि खडकवासला मतदारसंघात “तुतारीचा” आमदार होणार असल्याचेही सांगितले.
Ajit Pawar । अजित पवार गटाच्या नेत्याचा स्फोटक दावा; राजकारणात मोठी खळबळ