Uddhav Thackeray । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) मतदानाला फक्त आठ दिवस बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाला कल्याणमधून मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील वरिष्ठ नेता विजय उर्फ बंड्या साळवी यांनी पक्षाचे उपनेतेपद आणि जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. ४० वर्षे शिवसेनेशी निष्ठावान राहिलेल्या साळवी यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय पक्षातील घाणेरड्या राजकारणामुळे घेतल्याचं पत्रातून जाहीर केले आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा मोठा डाव; सदाभाऊ खोत यांना दिला मोठा झटका
साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पक्षात निष्ठावान राहिल्यानंतरही मला अचानक जिल्हाप्रमुख पदातून काढून टाकले गेले. तसेच कल्याण पश्चिम विधानसभेतील उमेदवारीबाबत मला विश्वासात घेतल नाही. पक्षाच्या संघटनेतील नेत्यांमध्ये पदवाटपाच्या बाबतीत खोटे बोलले गेले.” याशिवाय, सचिन बसारे यांना उमेदवारी देताना साळवी यांचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Sharad Pawar । बारामतीचे ‘दादा’ कोण? शरद पवारांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!
साळवी यांच्या राजीनाम्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, कारण त्यांची शिवसेनेशी असलेली ४० वर्षांची निष्ठा पक्षाच्या असंतोषामुळे मोडली. साळवी यांच्या पक्ष बदलण्याच्या निर्णयामुळे कल्याणमधील शिवसेना पक्षाची परिस्थिती अधिक अवघड झाली आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! भर सभेत शरद पवारांनी केले सर्वात मोठे वक्तव्य