Uddhav Thackeray । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी पुन्हा एकदा करण्यात आली आहे. औसा येथील हेलीपॅडवर ही तपासणी करण्यात आली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर देखील होते. यापूर्वी, जालना आणि वणी येथील प्रचार दौऱ्यादरम्यानही उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती, ज्यामुळे ठाकरे संतापले होते. त्यांनी याविषयी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या बॅगांची तपासणी करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी एक व्हिडिओ शूट करत, निवडणूक अधिकाऱ्यांना आग्रह केला की, “तुम्ही एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या बॅगांची तपासणी करा आणि ती तपासणी व्हिडीओद्वारे मला पाठवा,” असे म्हटले होते. यामुळे एकत्रित बॅग तपासणीच्या प्रक्रियेवर तीव्र चर्चा होऊ लागली आहे. ठाकरे गटाने या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून, त्यांचा आरोप आहे की, त्यांची बॅग तपासणी राजकीय दबावाच्या परिणामी केली जात आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा मोठा डाव; सदाभाऊ खोत यांना दिला मोठा झटका
उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्ह्यात प्रचार दौऱ्यावर असून, धाराशिवमध्ये ठाकरे यांच्या दोन प्रचार सभा होणार आहेत. उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभा होणार आहे, तर धाराशिव शहरात कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी सायंकाळी सात वाजता सभा होईल.
Sharad Pawar । बारामतीचे ‘दादा’ कोण? शरद पवारांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!