Harishchandra Chavan | ब्रेकिंग! निवडणुकीच्या काळात दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं झालं निधन

Bjp

Harishchandra Chavan | दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजपचे निष्ठावान नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती, आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू असतानाच, भाजपसाठी ही एक दुःखद बातमी समोर आली आहे. चव्हाण यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

Rohit Pawar । “…त्यांनी आमचं घर फोडले” , रोहित पवारांचे धक्कादायक वक्तव्य

हरिश्चंद्र चव्हाण यांचे राजकीय करिअर उल्लेखनीय होते. ते मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार केली होती. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भारती पवार यांचा 2 लाख 47 हजार मतांनी पराभव केला होता, ज्यामुळे ते भाजपचे चेहरा म्हणून ओळखले जात होते. 2019 मध्ये भाजपने त्यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते नाराज झाले होते आणि त्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्या आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी शेवटी अर्ज मागे घेतला.

Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी; राजकीय वर्तुळात खळबळ

हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन भाजप आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांसाठी एक मोठा धक्का ठरला आहे. त्यांच्या निधनामुळे दिंडोरी मतदारसंघात शोककळा पसरली आहे. चव्हाण हे भाजपसाठी एकनिष्ठ कार्य करणारे नेता होते, आणि त्यांच्या निधनाने राज्यातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

Nawab Malik । आताच्या घडीची मोठी बातमी! मतदानापूर्वीच नवाब मलिक तुरुंगात जाणार? समोर आली मोठी अपडेट.

Spread the love