Ajit Pawar । “विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर…”; अजित पवार यांचे मोठे वक्तव्य

Ajit Pawar

Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील पानसरेवाडीतील सभेत बारामतीकरांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी गंभीरपणे मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, लोकसभा निवडणुकीत काही मतदारांनी “गंमत” केली, पण यावेळी विधानसभेच्या निवडणुकीला गंभीरपणे सामोरे जावे लागेल. “लोकसभेला थोडी गंमत केली, आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जम्मतच होईल,” असे शब्द अजित पवार यांनी वापरले.

Raosaheb Danve । ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अखेर रावसाहेब दानवे यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर भाष्य करताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीत काही मतदारांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केलं, जे त्यांच्या अधिकारात होतं. पण यावेळी विधानसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. “आता आम्हाला महायुतीचे सरकार आणायचं आहे, आणि बारामतीकरांनी यावेळी गंभीरतेने मतदान करायला हवं,” असं त्यांनी सांगितलं.

Royal Enfield Goan Classic 350 । रॉयल एनफिल्ड लॉन्च करणार नवी Goan Classic 350, क्लासिक 350 चे आकर्षक आणि प्रगत आवृत्ती

अजित पवार यांनी भावनिक राजकारणाला बळी न पडण्याची सूचना केली. “तुम्ही घड्याळालाही मतदान करत आलात, पण यावेळी बारामतीचे भवितव्य आपल्या हातात आहे. त्यासाठी चांगल्या पद्धतीने मतदान करा,” असं ते म्हणाले. पवार यांचा इशारा होता की, लोकांना गोंधळात टाकणाऱ्यांना ठराविक किंमत चुकवावी लागेल. ते म्हणाले, “बारामतीकरांना कोणाचा भीती नाही, परंतु भविष्यात कामाची गरज आहे.”

Politics News । ब्रेकिंग! महिलांच्या खात्यात १ तारखेला तीन हजार रुपये येणार? बड्या नेत्याची घोषणा

Spread the love