मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाची काल मंगळवार, दि.4 ऑक्टोबर 2022 रोजी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. काल झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
‘या’ पिकामुळे चिकनचे वाढणार दर, कारण…
सिंचन योजनेला गती
सरकारने भंडारा (Bhandara) जिल्ह्यामधील सुरेवाडा उपसा सिंचन (Submersible irrigation) या योजनेला गती देण्यासाठी योजनेच्या ३३६ कोटी २२ लाख इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे (project) भंडारा जिल्ह्यातील २७ व गोंदिया जिल्ह्यातील १ अशा मिळून २८ गावांमधील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
बाजरीचा भाव तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढला, जाणून घ्या दर
दरम्यान, राज्यामधील पोलीस दलातील अधिकारी (Officers in the Police Force) आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच बँकांमार्फत घरबांधणीसाठी कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यामधील पोलिसांना खाजगी बँकांकडून कर्ज घेऊन पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामार्फत योजना राबविण्यात येत होती. त्यानंतर ७ जून २०२२ च्या शासन निर्णयाप्रमाणे ही योजना खंडीत करून पोलिसांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय नियमित घरबांधणी योजनेस अग्रीम योजनेस देण्याचा निर्णय घेतलाय.
आता शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाचणार; पीक काढणीसाठी लॉन्च केले सर्वात स्वस्त मशीन