Raj Thackeray । राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसेचा सुपडा साफ, एकही उमेदवार आघाडीवर नाही

Raj Thackeray

Raj Thackeray । विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर, महायुती आणि महाविकास आघाडीला काही ठिकाणी धक्का बसला असला तरी, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा निराशा प्राप्त होण्याची चिन्हे आहेत. राज ठाकरे यांनी मनसेच्या प्रचारासाठी अवघा महाराष्ट्र फिरला, पण निवडणुकीतील पहिल्या कलांमध्ये त्यांच्यासाठी सुखद बातमी येत नाही.

Baramati News । धक्कादायक! बारामतीत अजित पवार पिछाडीवर, युगेंद्र पवार आघाडीवर

मुंबईतील माहीम मतदारसंघातून सुरुवात झाली असली, तरी अमित ठाकरे आघाडीवर असतानाही, नंतर ते पिछाडीवर गेले आहेत. त्याचप्रमाणे, संदीप देशपांडे देखील वरळी मतदारसंघात पिछाडीवर आहेत. शिवडी मतदारसंघातील बाळा नांदगावकर हे सुद्धा प्रारंभिक कलेनुसार पिछाडीवर दिसत आहेत.

Bjp । ब्रेकिंग! निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपच्या नेत्याने केली सन्यास घेण्याची घोषणा!

अशीच अवस्था कल्याण ग्रामीण मतदारसंघातील राजू पाटील यांच्या बाबतीत आहे. त्यामुळे, मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नसल्याने राज ठाकरे यांची ‘सत्ता मिळवू’ अशी स्वप्नं पुन्हा तुटताना दिसत आहेत. महाराष्ट्रभर प्रचार दौरे करून, महाविकास आघाडीवर जोरदार टीका करणारे राज ठाकरे, आज आपल्या उमेदवारांच्या पराभवाच्या मार्गावर आहेत.

Shrigonda News । मोठी बातमी! “श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात विक्रम पाचपुते आमदार होणार?; एक्झिट पोलचा अंदाज

Spread the love