Eknath Shinde । महायुतीच्या दणदणीत विजयानंतर एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे वक्तव्य; म्हणाले…

Eknath Shinde

Eknath Shinde । राज्यात २० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवून ऐतिहासिक विजयाची कमाई केली आहे. महायुतीने २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी २२१ पेक्षा जास्त ठिकाणी आघाडी घेतली आहे, त्यात भाजपला एकट्याला १३१ ठिकाणी आघाडी मिळाली आहे. महायुतीच्या या शानदार विजयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Ajit Pawar । बारामतीत अजित पवार यांची आमदारपदी निवड, युगेंद्र पवार यांचा पराभव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी मिळाली आहे, यासाठी महाराष्ट्रातील सर्व मतदारांचे मी मनापासून आभार मानतो. गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये महायुतीने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचले आणि त्याची पोचपावती आजच्या निवडणुकीत मिळाली. सर्व समाजाच्या घटकांनी, लाडक्या बहिणींनी, लाडक्या भावांनी आणि शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केले. त्यांच्या या समर्थनामुळे महायुतीला अशी लँडस्लाईड व्हिक्टरी मिळाली आहे,” असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Raj Thackeray । राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसेचा सुपडा साफ, एकही उमेदवार आघाडीवर नाही

मुख्यमंत्रिपदावर बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या काही ठरलेलं नाही. ज्याच्या जागा जास्त असतील, त्याला मुख्यमंत्रिपद मिळावे, हे ठरलेलं नाही. आम्ही सगळे एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेऊ,” असे ते म्हणाले.

Devendr Fadanvis । “मी संध्याकाळी येतो…”: देवेंद्र फडणवीसांना अभूतपूर्व यशानंतर कोणी केला पहिला फोन?

Spread the love