Ladki Bahin Yojna । महायुतीसरकार लाडक्या बहिणींना देणार 2,100 रुपये; डिसेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयामध्ये लाडक्या बहिणींचा मोठा वाटा होता. महिलांच्या पाठिंब्यामुळे महायुतीला राज्यात बंपर विजय मिळाला, आणि आता या लाडक्या बहिणींसाठी सरकारने “रिटर्न गिफ्ट” देण्याची तयारी सुरु केली आहे. 13 लाख महिलांचे अर्ज, जे बँक खातं आधारशी लिंक न झाल्यामुळे प्रलंबित होते, ते आता मंजूर करण्यात येणार आहेत. या महिलांना डिसेंबर महिन्यातच 2,100 रुपये महिन्याला दिले जाणार आहेत.

Uddhav Thackeray । ब्रेकिंग! पराभवानंतर उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे वक्तव्य, म्हणाले…

राज्यात 2.34 कोटी महिलांना “लाडकी बहिन योजना”चा लाभ मिळत आहे, ज्यामध्ये प्रत्येकाला दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत. महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात योजनेचा लाभ वाढवून 2,100 रुपये करण्याचे वचन दिले होते, आणि आता ते वचन पूर्ण करण्याची तयारी सुरु झाली आहे. या योजनेसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, पण योजनेचा लाभ 2,100 रुपये करण्यासाठी सरकारला अधिक निधी वाढवावा लागणार आहे.

Achalpur Assembly Result 2024 | अचलपूर विधानसभेचा धक्कादायक निकाल, बच्चू कडू यांचा दारुण पराभव

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पुणे, नाशिक, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवली गेली असून, पुणे जिल्ह्यातील महिलांना याचा सर्वाधिक फायदा झाला आहे. आगामी सरकारमध्ये या योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा आहे. योजनेसाठी महिला व बालकल्याण खात्याचे मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे असू शकतात, कारण त्यांनी निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे.

Mahayuti Government । सर्वात मोठी बातमी! महायुती सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरला, ‘या’ दिवशी होणार मंत्रीमंडळाचा शपथविधी?

Spread the love