Eknath Shinde । मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, यावर अजून एकस्प्लीसिट उत्तर मिळालेलं नाही. 16 डिसेंबरपासून महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू होईल, त्याआधी 15 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू आहे, आणि इच्छुक आमदार एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेत आहेत.
शिवसेनेचे अनेक आमदार, ज्यामध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, भरत गोगावले आणि बालाजी किणीकर यांचा समावेश आहे, यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यामध्ये संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. यावेळी काही आमदारांना एकनाथ शिंदेंची भेट मिळाली, तर काहींना भेट नाकारण्यात आली.
पक्षाच्या सूत्रांनुसार, यंदा मंत्रीपदाच्या यादीत अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार असून, अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना यंदा मंत्रिमंडळातून बाहेर ठेवले जाणार आहे. यामध्ये दिपक केसरकर आणि तानाजी सावंत यांची पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे, मात्र त्यांना एकनाथ शिंदे यांची भेट मिळालेली नाही. सूत्रांच्या मते, या दोघांनाही यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही.