Santosh Deshmukh Murder । बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट!

Santosh Deshmukh Murder

Santosh Deshmukh Murder । बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी एक मोठी अटक केली आहे. हत्या आणि खंडणीसाठी आरोपी असलेला विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहोचली आहे. विष्णू चाटे याच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

Eknath Shinde । मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्यांना एकनाथ शिंदें यांनी दिला मोठा सल्ला; म्हणाले…

संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. सहा ते सात जणांनी त्यांची गाडी अडवली, त्यांना बेदम मारहाण केली आणि नंतर त्यांची हत्या केली. या प्रकरणात तीन आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती. आता चौथ्या आरोपीच्या अटकेमुळे पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे.

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पक्षाच्याच दोन मोठ्या नेत्यांना झटका

या घटनेने बीड जिल्ह्यातील राजकारणात तापलेले वातावरण आणखी तीव्र झाले आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या सर्व घडामोडींना वेगळा मोड देत, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या एका व्हिडीओमध्ये ते आरोपी सुदर्शन घुलेला एका हॉटेलमध्ये भेटताना दिसत आहेत.

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा पक्षाच्याच दोन मोठ्या नेत्यांना झटका

या हत्येप्रकरणात सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. विष्णू चाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्कालिन तालुकाध्यक्ष होते. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, आणि आरोपींच्या अटकेने या गुन्ह्यातील रहस्य उलगडण्यास मदत होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Spread the love