Mumbai News । कल्याण पश्चिमेतील योगिधाम परिसरातील आजमेरा हाईट्स सोसायटीत बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका मराठी कुटुंबाला किरकोळ कारणावरून रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. घटना अशी घडली की, सोसायटीमधील एका अमराठी कुटुंबात वाद सुरू झाला. हा वाद मिटवण्यासाठी शेजारी असलेल्या मराठी कुटुंबातील धीरज देशमुख यांनी हस्तक्षेप केला. त्यावर अमराठी महिलेने ‘तुम्ही मराठी लोक भिकारडे आणि चिकन-मटण खावून घाण करणारे’ अशी अशोभनीय शेरेबाजी केली. यामुळे वाद वाढला आणि हल्ल्याचे रूप घेतले.
अमराठी कुटुंबाने बाहेरून माणसांना बोलावून मराठी कुटुंबाच्या घरात घुसून लोखंडी रॉडने हल्ला केला. हल्ल्यात शुक्ला नावाच्या व्यक्तीने एक तरुणाच्या डोक्यावर रॉडने वार केले, ज्यामुळे त्याच्या डोक्यावर १० टाके पडले. हल्लेखोरांनी धमकावत ‘तुमको जगह पर लाऊंगा, मेरी सीएम ऑफिस में पहचान है’ अशी दमदाटी केली.
Ajit Pawar । दोन दिवसांपासुन नॉट रिचेबल असलेले अजित दादा आता ऍक्शन मोडवर!
या घटनेने सोसायटीत खळबळ माजली असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहिती नुसार, जखमींवर उपचार सुरू आहेत. या घटनेवर अनेकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.
Santosh Deshmukh Murder । बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट!