Ladki Bahin Yojna । राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात आली होती. योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलैपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, आतापर्यंत पाच हप्ते जमा झाले आहेत. आता सर्वांची नजर डिसेंबर महिन्याच्या हप्त्यावर लागली आहे.
Chhagan Bhujbal । राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप? छगन भुजबळ घेत आहेत मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीत या योजनेचा प्रचार एक महत्त्वाचा मुद्दा बनला होता, आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. महाविकास आघाडीकडून महिलांना तीन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं, तर महायुतीच्या नेत्यांनी महिलांना २ हजार १०० रुपये देण्याचं वचन दिलं होतं. सध्या महायुतीचं सरकार आल्यानंतर, योजनेतील बदलांचा विचार सुरू आहे, आणि २ हजार १०० रुपये देण्याची शक्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आहे.
Dhananjay Munde । राजकीय घडामोडींना वेग! धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. त्यांनी सांगितलं की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि डिसेंबरचे पैसे याच महिन्यात बँक खात्यात जमा होणार आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आश्वासन दिलं होतं. त्यामुळे लवकरच या योजनेचा लाभ लाभार्थींना मिळणार आहे.
Mumbai News । धक्कादायक! कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण