उत्तराखंडच्या (Uttarakhand) पौडी जिल्ह्यात 50 पेक्षा जास्त जणांना घेऊन जाणारी एक बस 500 मीटर खोल दरीत (deep valley) कोसळली आहे. या भीषण अपघातात 32 जणांचा मृत्यू (32 people died) झाला असून, 20 जण जखमी (injured) आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल (police) घटनास्थळी रवाना झालं होतं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आपत्ती नियंत्रण कक्षाला तातडीने मदत देण्याचे निर्देश दिले. यामध्ये श्रीनगर, कोटद्वार, सातपुली आणि रुद्रपूर येथील एसडीआरएफची बचाव पथके घटनास्थळी बचाव कार्यासाठी पोहोचले आहेत. बस 500 मीटर खोल दरीत पडल्याने बचावकार्यात अनेक अडचणी येत होत्या.
दसऱ्याच्या तोंडावर नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा, विभागीय आयुक्तांनी दिले आदेश
#UPDATE | Uttarakhand: A bus carrying 45 to 50 people fell into a 500-metre gorge. So far 6 people have been rescued and sent to the hospital: DGP Ashok Kumar https://t.co/2mpJTi4ICb pic.twitter.com/i6sJv412Gl
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) October 4, 2022
मोठी बातमी! शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास मिळणार 1 हजार रुपये?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ ही घटना घडली आहे. सिमडी येथील रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर असणाऱ्या 500 मीटर खोल दरीत ही बस कोसळली. या बसमध्ये 50 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीची चाकूने गळा चिरून केली हत्त्या, कारण वाचून व्हाल थक्क
या अपघातच कारण म्हणजे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. प्रांताधिकारी सदर प्रेमलाल टम्टा यांनी अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला. जिल्हाधिकारी विजयकुमार जोगदंडे यांनी ही मोठी दुर्घटना असल्याचे म्हटलंय.
खुशखबर! शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार निधी; राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय