
मुंबई : शनिवारी मुंबईच्या (Mumbai) डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत (Dombivli) कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला चक्क पेटवून दिले आहे. या घटनेत आगीने होरपळलेल्या (Fire) दोन मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण डोंबिवली परिसरात खळबळ माजली आहे.पत्नीला (Wife) पेटवल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी पतीने अपघाताचा बनाव केला होता. यामध्ये ही घटना अपघात म्हणून दिसावी यासाठी घराला (Home) आग लावली. आत्ताच नाही तर याआधी देखील चार वर्षापूर्वी त्याने पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शनिवारी पुन्हा संधी साधत पतीने हे कृत्य केलं.
दसऱ्याच्या तोंडावर नुकसानग्रस्तांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा, विभागीय आयुक्तांनी दिले आदेश
नेमक प्रकरण काय आहे?
डोंबिवलीत भोपर परिसरात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नी प्रीतीला पेटवून दिले होते.या घटनेत त्याच्या दोन मुली देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.दरम्यान रविवारी गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. पत्नीपाठोपाठ दोन मुली समीरा व समीक्षा या दोघींचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या घटनेत पती प्रसाद देखील जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
मोठी बातमी! शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणाऱ्यास मिळणार 1 हजार रुपये?
दरम्यान या तपासात ही दुर्घटना नसून हत्येचा कट असल्याचे उघड झाले. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात निर्दयी पती प्रसाद पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या निर्दयी पतीने सुरुवातीला ही घरात आग लागल्याने ही घटना घडल्याचा बनाव रचला होता. डोंबिवली भौपर गावात राहणारे प्रसाद आणि प्रीतीमध्ये कौटुंबिक वाद होते याच वादातून त्याने हे कृत्य केले.
प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीची चाकूने गळा चिरून केली हत्त्या, कारण वाचून व्हाल थक्क