Gurucharan Health Update । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील मिस्टर सोढी म्हणजेच अभिनेते गुरूचरण सिंह यांच्या तब्येतीबद्दल दुःखद माहिती समोर आली आहे. त्यांनी स्वतः हॉस्पिटलमधील व्हिडिओ शेअर करून आपल्या आरोग्याच्या स्थितीबाबत चाहत्यांना सांगितले. 19 दिवसांपासून काहीही खाल्लं किंवा प्यालं नसल्याने त्यांची स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे. त्यांच्या प्रकृतीवर चिंतेचे वातावरण आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Rain Update । सावधान! महाराष्ट्रात थंडीत पावसाची शक्यता, ‘या’ भागांमध्ये सरी बरसणार
गुरूचरण सिंह यांची प्रकृती मागील काही महिन्यांपासून ढासळत चालली होती. त्यांना काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाल्याचीही माहिती होती, मात्र ते नंतर घरी परतले. परंतु, त्यांच्या तब्येतीत सुधारणा न होताच, त्यांनी अन्नपाणी घेणे थांबवले आणि त्यांची अवस्था आणखी गंभीर झाली.