
Chhaava । अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या प्रमुख भूमिकांतील ‘छावा’ सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे पूर्ण झाले आहेत. 14 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने प्रारंभिक काळात बॉक्स ऑफिसवर धमाल केली होती. सिनेमाने पहिल्या आठवड्यात 225.28 कोटींची कमाई केली, तर दुसऱ्या आठवड्यात या आकड्यात आणखी भर पडली आणि 411.46 कोटींची कमाई केली.
Devendra Fadnavis । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, “महाराष्ट्रात 15 एप्रिलपर्यंत..”
तथापि, गेल्या तीन दिवसांपासून सिनेमाच्या कमाईमध्ये घट होत आहे. रिपोर्टनुसार, तिसऱ्या आठवड्यात सिनेमाची कमाई मंदावली आहे. सिनेमाने 21 व्या दिवशी 5.35 कोटींची कमाई केली, आणि यामुळे आतापर्यंतची एकूण कमाई 496.24 कोटीं झाली आहे. यामुळे सिनेमाला 500 कोटींचा आकडा पार करणं जवळपास निश्चित होईल, परंतु सनी देओल स्टारर ‘गदर 2’ चा 525.7 कोटींचा रेकॉर्ड पार करणे अवघड होईल असे दिसते.
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला या सिनेमाचा बजेट 130 कोटी होता, आणि त्याने या बजेटच्या 4 पट अधिक कमाई केली आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या अभिनयासोबतच सिनेमात संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘छावा’ सिनेमा किती मोठा विक्रम करू शकेल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.