
Disha Salian Case । दिशा सालियान यांच्या मृत्यूबाबत एक खळबळजनक खुलासा त्यांच्या वडिलांनी केला आहे. दिशा सालियान, ज्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या माजी व्यवस्थापक होत्या, त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या संशयास्पद मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिशा यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
Devendr Fadanvis । रिल बनवणाऱ्या सरकारी अधिकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा!
याचिकेमध्ये दिशा सालियान यांच्या मृत्यूला असलेल्या आरोपांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यातील प्रमुख आरोप असा आहे की, दिशा यांच्यावर अमानुष अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आणि काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय स्तरावर या प्रकरणाचा पर्दाफाश रोखण्याचा प्रयत्न केला गेला. याचिकेत सांगितले आहे की, मुंबई पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या फॉरेन्सिक पुराव्यांकडे दुर्लक्ष केले आणि हे प्रकरण आत्महत्या किंवा अपघाती मृत्यू म्हणून झपाटले.
Crime News l धक्कादायक! नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांड, अजित पवार गटाचा नेता आणि त्याच्या भावाची हत्या
सतीश सालियान यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे (CBI) सोपवण्याची विनंती केली आहे.
शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी या बाबीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “चार वर्षांनंतर हे प्रकरण अचानक चर्चेत का आलं?” त्यांच्यानुसार यामागे कुणाचा तरी कट असल्याचा संशय आहे. तसेच, CID आणि SIT या प्रकरणाची चौकशी करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
Reliance Jio चे 90 दिवसांसाठी JioHotstar सबस्क्रिप्शन आणि मोठे फायदे, स्वस्त डेटा प्लॅन लाँच
दरम्यान, दिशा सालियान यांचा मृत्यू ८ जून २०२० रोजी मुंबईतील मलाडमध्ये एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून झाला. या प्रकरणाचे स्वरूप सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंदवले गेले होते. त्यानंतर सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू १४ जून २०२० रोजी घडला, आणि त्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश