Saurabh Rajput Murder | मेरठ हत्याकांडातील आरोपी मुस्कान गर्भवती; पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा

Blue Drum Case

Saurabh Rajput Murder | उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झालेल्या क्रूर हत्याकांडामुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. पतीची हत्या करून प्रियकराच्या मदतीने शवाच्या तुकड्यांचा निळ्या ड्रममध्ये पुरलेली घटना एका धक्कादायक आणि अत्यंत क्रूर गुन्ह्याचा भाग आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुस्कान रस्तोगी हिच्या गर्भवती असल्याचे आता उघडकीस आले आहे.

Ajit Pawar । अजित पवारांचा छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना इशारा! म्हणाले…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला या दोघांनी मिळून मुस्कानच्या पती सौरभ राजपूतची हत्या केली होती. हत्या केल्यानंतर दोघांनी मृतदेहाचे तुकडे करून त्या तुकड्यांना सिमेंट आणि पाणी घालून एका ड्रममध्ये भरले आणि ड्रम बंद केले. त्यानंतर, हत्या करणाऱ्या जोडीने हिमाचल प्रदेशात जाऊन लग्न केल्याचे समोर आले आहे.

Deenanath Hospital l दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय: डिपॉझिट न घेण्याचा ठराव

मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि सौरभच्या हत्या नंतर दोघे ११ दिवस हिमाचल प्रदेशात सुट्टीवर गेले होते. मुस्कानच्या गर्भवती असल्याचे तपासात समोर आले आहे, पण ती किती महिने गर्भवती आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

गर्भवती असल्याचे समोर येताच, तिच्या रुग्णालयात तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीची गरज आहे. मुस्कान आणि साहिल दोघेही सध्या तुरुंगात आहेत आणि त्यांच्यावर हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप आहेत.

Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात अलर्ट जारी! वाचा हवामान विभागाचा ताजा अंदाज

सौरभ राजपूत हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते आणि नंतर लंडनमध्ये बेकरीत काम करत होते. फेब्रुवारी २०२५ मध्ये ते भारतात परत आले होते आणि काही दिवसांनंतरच त्यांची हत्या करण्यात आली. मुस्कानच्या मुलीच्या माहितीवरून हत्येचा पर्दाफाश झाला.

Spread the love