मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी (Mithilesh Chaturvedi) यांनी बुधवारी (३ ऑगस्ट) रोजी शेवटचा श्वास घेतला. मागच्या अनेक दिवसांपासून मिथिलेश हे हृदयरोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाच्या माहितीने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
माहितीनुसार, मागच्या अनेक वर्षांपासून मिथिलेश याना हृदयासंबंधित आजार असल्यामुळे ते त्यांचे मुळगाव लखनऊ या ठिकाणी स्थायिक झाले होते. मात्र काल ३ ऑगस्टला त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जावई आशिष चतुर्वेदी (Ashish Chaturvedi) यांनी याबाबत फेसबुक पोस्ट देखील शेअर केली आहे.
आशिष चतुर्वेदी यांनी त्यांच्या फेसबुकवर मिथिलेश यांचे काही फोटो शेअर केले आणि कॅप्शन मध्ये लिहिले की,“तुम्ही जगातील सर्वोत्तम पिता होता. तुम्ही मला जावई म्हणून नाही तर मुलाप्रमाणे प्रेम दिले. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो.” मथिलेश यांनी ‘सत्या’, ‘ताल’, ‘फिजा’, ‘रोड’, ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘गांधी माय फादर’ यांसारख्या अनेक चित्रपटात झळकले. यात ‘कोई मिल गया’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ या चित्रपटामध्ये विशेष भूमिका साकारली आहे.