चक्क कला शाखेच्या विद्यार्थ्याने बनवला शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन, 10 मिनिटात एक एकरावर करणार फवारणी

A drone for agricultural spraying made by an art student will spray an acre in 10 minutes

वर्धा (Wardha) जिल्ह्यातील हिंगणघाटमधील कला शाखेत द्वितीय वर्षात (Arts students) शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आपल्या कलेतून धमालच केली आहे. या विद्यार्थ्याने शेतकऱ्यांचं (Farmers) कष्ट कमी करण्यासाठी हातभार लावला आहे. या विद्यार्थ्यानं शेतीच्या फवारणीसाठी ड्रोन (Drone) बनवला आहे. राम कावळे (Ram Kavale) असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या ड्रोनच वैशिष्टय म्हणजे फक्त 10 मिनिटात या ड्रोनमध्ये एक एकरावर फवारणी करण्याची क्षमता आहे. हा ड्रोन तयार करण्यास जवळपास चार लाख रुपये खर्च आला आहे. या ड्रोनची सर्वत्र चर्चा सुरू आहे. इतकंच नाही तर रामच्या या कामगिरीची सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

प्रियकरासाठी चक्क मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्त्या

तसेच रामचा आणखी संशोधन करत स्वस्त ड्रोन बनवण्याचा त्याचा मानस आहे. हा ड्रोन त्याने स्वतःच अभ्यास करुन बनवला आहे. महत्वाची बाब म्हणजे दहा लीटर क्षमतेची टाकी या ड्रोनला आहे. शेताच्या चारही बाजूंची कमांड दिल्यावर हा ड्रोन अवघ्या पंधरा ते विस मिनिटात एक एकर फवारणी करतो. विशेष म्हणजे रामने समुद्रपुरच्या विद्याविकास कनिष्ठ महाविद्यालयात ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीचा व्यावसायिक कोर्स केला. याच ज्ञानाचा उपयोग करून रामने महाविद्यालयात बीएचं शिक्षण घेताना चक्क ड्रोन बनवला.

Varun Dhawan: वरुण धवनने ‘ए वतन मेरे वतन’ चित्रपटाची केली घोषणा केली, सारा अली खानची अशी केली नक्कल

गरीब घरातील राम कावळे याने आजोबाच्या आणि नातेवाईकाच्या मदतीनं सुटे भाग एकत्र करत हा ड्रोन तयार केला आहे. सुटेभाग लवकर उपलब्ध झाल्यास लवकर ड्रोन तयार करू शकतो अशी माहिती रामने दिली.सरकारनं अनुदान दिल्यास आणि संशोधनास वाव दिल्यास निश्चित शेतकऱ्यांना कमी किंमतीत ड्रोन उपलब्ध होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना शेतीतून उत्पादन घेण्यासाठी खूप काबाडकष्ट करावे लागते.एकीकडं नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असलं तरी आर्थिक परिस्थितीमुळं शेतकऱ्यांना महागडी उपकरणं विकत घेणं शक्य होत नाही. म्हणून राम कावळे याने हा ड्रोन बनवला आहे.

Cotton: दसऱ्याच्या मुहूर्तावर कापसाला मिळाला अकरा हजारांचा भाव, पहिल्याच दिवशी समाधानाचे वातावर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *