Sanjay Raut : संजय राऊत यांना जेल की बेल? पत्राचाळ घोटाळाप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी

Jail or Bail for Sanjay Raut? Court hearing today in the mail scam case

मुंबई : संजय राऊतांची (Sanjay Raut) ईडी कोठडी आज संपणार असल्यामुळे त्यांना कोर्टातमध्ये हजार केले जाणार आहे. राऊतांना आज जामीन मिळणार का? असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित राहिला आहे. संजय राऊतांना गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी तब्बल 16 तासांच्या चौकशीनंतर राऊतांना अटक करण्यात आली. राऊतांना अटक होताच दुसऱ्या दिवशी जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. जेजेत वैद्यकीय चाचणी केल्यानंतर दुपारी त्यांना कोर्टात (court) हजर करण्यात आलं होतं. यावेळी ईडीकडून राऊत यांच्या सात दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण राऊतांच्या वकिलाने त्याला विरोध केला होता. त्यानंतर कोर्टाने राऊत यांना तीन दिवसाची ईडी कोठडी सुनावली होती.

तब्बल नऊ तास ED कडून चौकशी…..

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर ईडीने छापेमारी करून तब्बल 9 तास तपास चालू होता. राऊत यांच्या भांडूप येथील बंगल्यात ही धाड मारण्यात आली होती. त्याचवेळी राऊत यांच्या दादरमधील गार्डन कोर्ट फ्लॅटवरही छापा मारण्यात आला होता. तसेच गोरेगाव येथेही छापा मारण्यात आला होता. त्यानंतर राऊत यांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले होते. तिथेही राऊत यांची चौकशी करून रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांना अटक करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना तीन दिवसांची कोठडी सुनावली होती. राऊत यांची कोठडी आज संपत असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

जामीन मिळणार की नाही?

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात लवकर जामीन मिळणार नसल्याने राऊतांना जामीन मिळणार का नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यामुळे अनेक चर्चाना उधाण आलं आहे. माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सुद्धा 4 महिने 27 दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांनाही जामीन मिळाला नाही. त्यामुळे राऊत यांना जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *