Salman Khan: ‘या’ अल्पवयीन मुलाला दिली होती सलमान खानची सुपारी, दिल्ली पोलिसांनी केली अटक

Salman Khan's betel nut was given to 'this' minor boy, arrested by Delhi Police

मुंबई: सिद्धू मुसेवालाच्या (Sidhu Musewala) हत्येनंतर सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान यांनादेखील कोणीतरी पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी दिली होती. दरम्यान या धमकी (threat) प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती मोठा सुगावा लागला आहे. हा सुगावा म्हणजे सलमान खानला मारण्याची जबाबदारी दोन दहशतवाद्यांसोबत एका अल्पवयीन मुलावर सोपवण्यात आली होती. दरम्यान त्या संदर्भात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सिद्धू मुसेवालाची हत्या केल्यानंतर थोड्याच कालावधीत सलमान खान आणि वडील सलीम खान यांनादेखील पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

जगात सर्वाधिक पैशाची उलाढाल दूध व्यवसायामध्ये होते, कारण…

या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. इतकंच नाही तर अभिनेता सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली होती. दरम्यान सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे. ती माहिती म्हणजे मोहाली येथील पंजाब पोलीस मुख्यालयावर ९ मे ला आरपीजी हल्ला झाला होता. या हल्ल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोन दहशतवादी आरोपींना अटक केली.

Vinayak Raut: भाजपचे माजी मंत्री शिवसेनेत येण्याच्या तयारीत, विनायक राऊतांचा दावा

दरम्यान चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला जीवे मारण्याचे काम देण्यात आले होते. इतकंच नाही तर या अल्पवयीन मुलाशिवाय, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे, ज्याचे नाव अर्शदीप सिंह आहे. पोलिसांनी ४ ऑगस्ट रोजी अर्शदीप सिंहला हरियाणामध्ये स्फोटके जप्त केल्याप्रकरणी अटक केली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळी आणि पंजाबमधील सुप्रसिद्ध गुंड जग्गू भगवानपुरिया या दोघांनी एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने सलमान खानच्या हत्येची सुपारी दिली होती.

धक्कादायक! बसचा अपघात होऊन एका मुलासह 11 जणांचा होरपळून मृत्यू

महत्वाची बाब म्हणजे गँगस्टर जग्गू भगवानपुरियावर सिद्धू मुसेवाला हत्येच्या आरोप आहे. तसेच हा अल्पवयीन तरुण उत्तर प्रदेशातील फैजाबादचा रहिवासी आहे. तर तो दुसरा व्यक्ती दीपक हरियाणातील सुरखपूर येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी गुजरातमधील जामनगर येथून अटक केली असून त्यांना मदत करणारे स्थानिक नेटवर्कही शोधून काढले आहे.

पुणे-सोलापूर मार्गावर श्रीगोंद्यातील स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात! एक जण जागीच ठार

का आहे सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या निशाणावर ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान येथे बिश्नोई समाज आहे. हा बिश्नोई समाज काळ्या हरणाला अत्यंत पवित्र मानतो. दरम्यान “हम साथ साथ है” चित्रपटाच्या शुटींगच्या वेळी सलमाने राजस्थानच्या जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केल्याचा आरोप होता. या कारणामुळेच लॉरेन्स बिश्नोईने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खान लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रडारवर असून त्याला दोनदा ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता.

‘पुष्पा 2’मध्ये ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याची होणार एंट्री

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *