Nayantara-Vignesh: अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच झाले आईबाबा; जुळ्या मुलांचे आगमन

Actress Nayantara and Vignesh became parents just four months after marriage; The arrival of twins

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा (Nayantara) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. दरम्यान अभिनेत्रीने चाहत्यांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच नयनतारा आई झाली आहे. नयनताराने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. विग्नेश शिवनने त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

बापरे ! चक्क पाण्याची विहिरच गेली चोरीला, वाचा सविस्तर..

विग्नेशने (Vignesh) त्याच्या ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने बाळांच्या पायाचे फोटो शेअर केले आहे. तर एका फोटोत नयनतारा ही बाळाच्या पायाकडे बघत गोड हसताना दिसत आहे. त्याचबरोबर याला कॅप्शन देत गुडन्यूज दिली आहे.

Lumpy: ‘लम्पी’ रोगाने मृत पावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये शासनाने केला बदल; आता मिळणार ‘इतकी’ रक्कम

“नयन आणि मी आज आई-वडील झालो आहोत. आम्हाला दोन जुळी मुलं झाली आहेत. आमच्या प्रार्थना आणि पूर्वजांचे आशीर्वाद आम्हाला आमच्या दोन्ही मुलांच्या रुपाने मिळाले आहेत. आम्हाला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे. उईर आणि उलगम”, असे कॅप्शन देत विग्नेशने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

ज्येष्ठ विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीचा लागला धक्का, शौचालयात नेऊन केला सामूहिक बलात्कार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *