चाळीसगाव: चाळीसगाव (Chalisgaon) शहरामध्ये एका अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविल्याची (ran away) धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात (police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील आदर्शनगरातील ओमप्रकाश रतन थेटे (वय ४५) हे पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दरम्यान त्यांच्याकडे त्यांचा सोळावर्षीय पुतण्या शिकायला होता. तो पिंपरखेड येथील शाळेत अकरावी विज्ञान शाखेत शिकत होता.
ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किंमती, खाद्यतेलाचे दरही उंचावले
दरम्यान घडल अस की तो शुक्रवारी (ता. ७) चाळीसगाव येथील मित्राकडून नोट्स घेऊन येतो, असे घरच्यांना सांगून गेला. दरम्यान सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ओमप्रकाश थेटे शाळेवरून घरी आले. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलाला पुतण्याबाबत विचारपूस केली. तेव्हा त्यांच्या मुलाने सांगितले की, तो मित्रांकडे नोट्स घेण्यासाठी गेला आहे. त्यानंतर ओमप्रकाश थेटे यांनी मित्रांसह परिसरात शोधाशोध केली.
परंतु पुतण्याची फक्त सायकल आढळून आली. दरम्यान पुतण्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेले, अशी खात्री ओमप्रकाश थेटे यांना झाली. यावेळी त्यांनी लगेचच चाळीसगाव शहर पोलिस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. दरम्यान याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार सुरू आहे.