आपण दररोज सोशल मीडियावर (social media) वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहतो. मग यामध्ये डान्सचा व्हिडीओ, मनोरंजनाचे, खेळाचे तसेच प्राण्यांचे देखील व्हिडिओ (video) येतात. अशातच सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. ट्विटरवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ चिंपांझीचा (chimpanzees )आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये चक्क चिंपाझी पिझ्झा डिलिव्हरी (Pizza delivery) करण्यासाठी घराच्या दारात पोहोचताना दिसत आहे. दरम्यान या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप लाइक्स मिळत आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील पट्ठ्या लिंबातून कमवतोय वर्षाकाठी चार ते साडेचार लाख रुपये
व्हिडिओ मध्ये नेमक काय दिसतय ?
व्हिडिओत अस दिसतय की एक डिलिव्हरी बॉय घराची बेल वाजवतो. दरम्यान डिलिव्हरी बॉय त्याच्या बॅगेतून पिझ्झाचे पॅकेट काढतो. पुढे तो बेल वाजवतो दरम्यान एकदा बेल वाजवल्यानंतर कोणी बाहेर येत नाही तेव्हा डिलिव्हरी बॉय पुन्हा बेल वाजवतो. पुढे काय दरवाजा कोण उघडत तर चिंपांझी उघडतो. एवढेच नाही तर चिंपांझी डिलिव्हरी बॉयला पैसे देतो आणि पिझ्झा घेऊन दरवाजा बंद करतो.
Rakhi Sawant: राखी सावंतबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?, वाचा सविस्तर
Chimpanzee paying for a pizza delivery in Russia 😳 pic.twitter.com/YCvlUUvwZt
— OddIy Terrifying (@closecalls7) October 3, 2022
दरम्यान चिंपांझींनाअसे करताना पाहून डिलिव्हरी बॉय देखील घाबरतो आणि तिथून पळून जातो. व्हिडिओ पाहून यूजर्स देखील आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर @closecalls7 नावाने शेअर करण्यात आला आहे. दरम्यान आतापर्यंत हा व्हिडिओ १७ लाखांहून अधिक जास्त पहिला गेला आहे. तसेच व्हिडिओला अडीच लाखांहून अधिक युजर्सनी लाईक केले आहे. इतकंच नाही तर हा व्हिडिओ ३४ हजार युजर्सनी रिट्विट केले आहे.