मुंबई : एकीकडे शिवसेना (shivsena) नेमकी कोणाची यासाठी ठाकरे गट संघर्ष करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेची तोफ समजल्या जाणाऱ्या संजय राऊतांची (Sanjay Raut) गोरेगाव पत्राचाळ प्रकरणातून तुरुंगातून सुटका होईना. दरम्यान आज संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी राऊत यांना कोर्टाच्या आवारात शिवसेनेचे निवडणूक चिन्ह (symbol) धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
VIDEO: चक्क पिझ्झा डिलिव्हरी घेतली चिंपांझीने, डिलिव्हरी बॉय पडला बुचकळ्यात
खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक
संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षाचे नवीन चिन्ह कदाचित क्रांती घडवून आणेल. इतकंच नाही तर भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ. पुढे संजय राऊत म्हणाले की, आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ आहे. या आधीही जनसंघ, काँग्रेस यांच्यावरही चिन्ह गोठवण्याची वेळ आली होती. आता यात काही नवीन नाही. याउलट नवीन चिन्हानंतर हे पक्षही मोठे होईल. आणि महत्वाची बाब म्हणजे खरी शिवसेना कोणती आहे, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे चिन्ह बदललं तरी लोक आपल्याशी जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Ajit Pawar: “शेतकऱ्यांनो मुख्यमंत्र्यांकडे लक्ष देऊ नका तर शेतीतील कामाकडे लक्ष द्या -अजित पवार
ठाकरे गटांकडून तीन चिन्हांचा पर्याय
निवडणूक आयोगाला शिवसेना ठाकरे गटांकडून तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात आला आहे. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. तसेच पक्षाच्या नावांसाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तीन पर्याय देण्यात आले आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील पट्ठ्या लिंबातून कमवतोय वर्षाकाठी चार ते साडेचार लाख रुपये
शिंदे गटानेही दिला या तीन चिन्हांचा पर्याय
दुसरीकडे शिंदे गटानेदेखील निवडणूक आयोगाला तीन चिन्हे पाठवली आहेत. इथे देखील ठाकरे गटाची शिंदे गटाने कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. शिंदे गटाने दिलेल्या चिन्ह्यांच्या पर्यायात उगवता सूर्य आणि त्रिशूळचा पर्याय दिल्याची माहिती आहे. तर, पक्षाच्या नावातही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
Rakhi Sawant: राखी सावंतबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?, वाचा सविस्तर