मुंबई : बेस्ट प्रशासनाने एक वेगळाच नियम काढला आहे. त्यामुळे कंडक्टर (conductor) वर्ग संतप्त झाल्याचे दिसत आहे. आता जर तिकीट काढण्याचं मशीन बिघडलं तर कंडक्टरच्या पगारातून पैसे कापले जाणार आहेत. असा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतलाय. प्रशासनाच्या या निर्णयामुळे कर्मचारी चांगलेच संतापले आहेत.
मुसळधार पावसाचा कहर, शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
बेस्ट प्रशासनाने ईटीआय मशीनची (ETI Machine) देखभाल कऱण्याबद्दल एक परिपत्रक काढलंय. त्यामध्ये कंडक्टरला या मशीनची काळजी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या पत्रकामधे तिकीट काढण्याच्या मशीनचे दर देखील दिले आहेत. यामध्ये १५ पार्ट आहेत. त्यामध्ये सर्वात महाग पार्ट म्हणजे मेन बोर्डचा खर्च ८ हजार ४३८ रुपये दाखवण्यात आलाय.
Heavy rain: आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता!
यामध्ये आता कोणताही पार्ट बिघडला, त्याचा सर्व खर्च कंडक्टरच्या पगारातून कट करण्यात येणार. प्रशासनाच्या या निर्णयामुळे आता बेस्टचे कर्मचारी संतप्त झाले आहेत. ते आता आंदोलन करण्याच्या मार्गावर आहेत.
Sanjay Raut: “आमच्यात शिवसेनेचं ‘स्पिरीट’ ..”, धनुष्यबाण गोठवल्यावरून संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया