मुंबई : काल राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. जोरदार पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच फजिती केली त्यामुळे लागवडीचा तरी खर्च निघेल का असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न उपस्थित झाला आहे.
मोठी बातमी! पुन्हा एसटी संप होणार? ‘या’ कारणामुळे संतापले कर्मचारी
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून त्याची गंज लावून ठेवली होती पण त्या शेतकऱ्यांची गंज झाकताना चांगली तारांबळ उडाली आहे. पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे सोयाबीन काढण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे.
सोशल मीडियावर तरुणीसोबत झालेली ओळख एका तरुणाला पडली महागात
दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेंगा वाळल्या आहेत. तर काहींना मजूर मिळाले नाहीत म्हणून सोयाबीन पीक काढता आले नाही. त्यामुळे शेतातल्या शेंगाना कोंब फुटण्याची भीती शेतकऱ्याला आहे. जर सोयाबीनच्या शेंगाना कोंब फुटले तर काहीच पीक हातात येणार नाही, अशी भीती शेतकरी व्यक्त करतायेत.
जेवण सुरू करण्याआधी ताटाभोवती पाणी का शिंपडले जाते? वाचा सविस्तर