श्रीगोंदा : आपण आपल्या आजूबाजूला पाहतच असतो की एखाद्या गोष्टीचे अमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जाते. अशीच एक धक्कादायक घटना श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील घारगाव (Ghargaon) या ठिकाणी घडली आहे. एका 31 वर्षीय महिलेला स्टील कंपनीतून बोलतोय सांगत स्टील देतो, म्हणत एका व्यक्तीने 6 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सोशल मीडियावर तरुणीसोबत झालेली ओळख एका तरुणाला पडली महागात
आता या प्रकरणावरून पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेल्या महिलेला अमित मित्रा गोयल या व्यक्तीने या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरून ४ ऑक्टोबर रोजी फोन केला.
मोठी बातमी! पुन्हा एसटी संप होणार? ‘या’ कारणामुळे संतापले कर्मचारी
स्टील मिळवून देऊ असं महिलेला अमिष दाखवून व्हाट्सअपवर नकली कागदपत्र देखील पाठवली. त्यानंतर आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर महिलेने सहा लाख रूपये पाठविले. नंतर महिलेच्या लक्षात आले की आपली फसवणूक झाली आहे. दरम्यान महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
जेवण सुरू करण्याआधी ताटाभोवती पाणी का शिंपडले जाते? वाचा सविस्तर