Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांना लिहिलेले शेतकऱ्याच्या मुलाचे पत्र होतेय व्हायरल

A farmer's son's letter to the Chief Minister is going viral

हिंगोली : शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना एक पत्र लिहिले आहे सध्या हे पत्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हिंगोलीमध्ये शाळेत शिकणार्‍या मुलाने हे पत्र लिहिलंय. या पात्राच्या माध्यमातून त्या चिमुकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून दिवाळीच्या मुहूर्तावर लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.यामध्ये विशेष बाब म्हणजे चिमुकल्याने मुख्यमंत्र्यांना पुरणपोळी खाण्याचे आमंत्रण देखील दिले आहे.

अग्नितांडव! भीमाशंकरला भाविकांना घेऊन निघालेल्या बसने घेतला पेट

पाहा चिमुकल्याने काय म्हंटलय पत्रात?

एकनाथ शिंदे
सायेब, मंत्री, मूंबई
माझे बाब शेती करतात, आमच्या घरी शेती खूप कमी आहे, असं बाबा म्हनतात. मी बाबाले म्हणल की मला गूपचूप खायले पैसे द्या मग बाबा म्हया संग भांडन करतात. म्हनतात यंदा सगळी सोयाबीन गेली, वावर इकुन देतो तूले दहा रुपये. दसर्‍याले आईन पूरण पोळ्या पण नाही केल्या. आई म्हणे इथ इश खायला पैसे नाहीत. रानातील सोयाबीन गेली. महे बाबा दुसर्‍याच्या कामाले जातात. मी आईला म्हणत आपल्याले दिवाळीले पोळ्या कर ती म्हणते की बँकेत अनूदान आलं की करु पोळ्या. साहेब आमच्या घरी पोळ्या करायले पेसे नाहीत. आम्हाला घर नाही, आम्हाले काहीत नाही. मी बाबा संग भांडन केलं की ती आई म्हणे आपल्या जवळच्या जयपूरच्या गावात शेतकरी त्याच्या पोरान पेसे माघीतले मनून फासी घेतली आता मी बाबाले पेसे नाही मागत. साहेब आमच घर पाहा की तूम्ही या आनूदानचे पेसे लवकर द्या. मग दिवाळीले आई पोळ्या करते. तूम्ही पण या पोळ्या खायले, सायेब
तुमचा आणी बाबाचा लाडका
प्रताप कावरखे, वर्ग ६
जी.प. शाला गोरेगाव
हींगोली

मराठा आरक्षणाच्या सुविधांसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक पडली पार, घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *