आपल्या भारत (India) देशाच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रामुळे फायदा होत असतो विशेष म्हणजे भारत देश हा कृषिप्रधान देश (agrarian country) म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर देशातील 90 टक्के लोकसंख्या शेती (agriculture) करतात. शेती हा व्यवसाय करून देशातील बरेच लोक आपली उपजीविका करत आहे. दरम्यान जस जसा आधुनिक तंत्रज्ञानात वेगवेगळा बदल होऊ लागला तसच बदल शेती व्यवसायातही झाला. आता शेतकरी (farmers) शेतीतून कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मुळात हे शक्य झाले ते तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्रीमुळे.
Engineering: राज्य सरकारचा मोठा निर्णय! इंजिनीयरींगचे शिक्षणही आता मिळणार मराठीतून
सध्या आपल्या देशात मुख्यतः रब्बी हंगाम आणि खरीप हंगामात अशी वेगवेगळी पिके घेतली जातात. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत शेतकरी वर्गाचा फळशेती आणि फुलशेती कडे जास्त कल वाढला आहे. याच महत्वाचं कारण म्हणजे कमी वेळात जास्त उत्पन्न मिळवण्याच पीक म्हणजे फळ आणि फुल शेती. तसेच शेतकरी आत्ता आंतरपीक म्हणून झेंडूची (Marigold) लागवड करतात. या झेंडू पिकातून शेतकरी मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहेत.
दिव्यांगांना बसमध्ये मिळणार मोफत प्रवास, ‘ही’ कागदपत्र आवश्यक
दरम्यान बीड (beed) जिल्ह्यातील निमगाव या गावातील शिवाजी धोंडीबा देवकर (Shivaji Dhondiba Deokar) या शेतकऱ्याने कपाशीच्या रानात झेंडूची लागवड केली होती. शिवाजी देवकर यांच्या घरात घरात 6 व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या फुलशेतीला चांगले पाठबळ मिळाले होते. महत्वाची बाब म्हणजे वर्षभर झेंडूची फुलं विक्री करून त्यांना रोजचा पैसा मिळत होता त्यामुळे त्यांनी फुलशेतीवरच आपले लक्ष केंद्रित केले आहे.
कैद्यांसाठी आनंदाची बातमी! आता कारागारगृहातही ठेवता येणार शारीरिक संबंध
शिवाजी धोंडीबा देवकर यांनी सांगितले की, फुलांना चांगला भाव सुद्धा मिळत आहे. रोज फुलांची विक्री करून त्यांना रोजच्या रोज ताजे उत्पन्न मिळत असल्यामुळे वर्षाकाठी ते 3 ते 4 लाख रुपये उत्पन्न अगदी सहजपणे मिळवतात. महत्वाची बाब म्हणजे या पिकासाठी इतर पिकांच्या तुलनेत कमी कष्ट आणि कमी मजूर लागतात. पण उत्पन्न मात्र जास्त येते म्हणून शिवाजी देवकर यांनी फुलशेती करण्यावरच भर दिला आहे.
Taimur Khan: बापरे! तैमूर खानला सांभाळणाऱ्या आयाला मिळतो ‘इतका’ पगार? ऐकून व्हाल थक्क