मुंबई : बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व जिंकल्यानंतर महाराष्ट्राचा लाडका शिव ठाकरे हिंदी बिग बॉस सीझन 16 (Hindi Bigg Boss Season 16) मध्ये सहभागी झाला आहे. दरम्यान शिव ठाकरेने (Shiv Thackeray) पहिल्या दिवसापासूनच सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या हिंदीच्या १६ व्या पर्वात खरेपणाने आणि प्रामाणिकपणे खेळत आहे. त्यामुळे सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. शिव ठाकरे सोशल मीडियावर (Social media) ट्रेंडमध्ये असल्याचे पाहायला मिळतोय. तसेच पहिल्याच आठवड्यात सलमान खानने तू चांगलं खेळतोस असं म्हणत त्याने शिवला काही टीप्सही दिल्या होत्या.
एसटी महामंडळ रीलस्टार लेडी कंडक्टरसमोर झुकले, अखेर मंगल गिरी यांचे निलंबन मागे
नुकतंच शिवने त्याच्या गर्लफ्रेंड (girlfriend) आणि खासगी आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सर्वाधिक चर्चा रंगली होती ती म्हणजे अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव ठाकरेच्या लव्हस्टोरीची .खरतर या दोघांच्या लव्हस्टोरीमुळे बिग बॉसला चार चांद लागले. सगळीकडे या दोघांच्या प्रेमाची चर्चा झाली. दरम्यान काही महिन्यानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. तसेच बिग बॉसच्या हिंदीच्या 16व्या पर्वात जाण्याआधी शिव ठाकरेने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला अनेक गोष्टींबद्दल विचारण्यात आले.
चक्क घराची भिंत पाडताना सापडली तब्बल 160 हून अधिक चांदीची नाणी, पुढे झालं अस की…
यावेळी बोलताना शिव ठाकरे म्हणाला की, “मी स्पष्ट विचार करणारा व्यक्ती आहे. माझं आयुष्य ओपन बुक आहे. कारण मी माझ्या आयुष्यातील कोणत्याच गोष्टी लपवून ठेवलेल्या नाहीत. तुम्ही मला काहीही विचारा मी तुम्हाला सहज उत्तर देईन. तसेच आतापर्यंत माझ्या 169 गर्लफ्रेंड होत्या. दरम्यान याचा खुलासा मी बिग बॉसकडे आधीच केला आहे. मी माझ्या पहिल्या गर्लफ्रेंडला कसा भेटलो, कोणाला सरप्राईज दिले, याबद्दलही मी सांगितले आहे.”असे शिव ठाकरे म्हणाला.
Viral Video: जिमच्या इक्विप्मेंटवरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी