
सांगली : महाराष्ट्रातले शेतकरी नेहमी वेगवेगळ्या प्रकारची शेती करत असतात. दरम्यान यावेळी सांगली (Sangli) जिल्ह्यात शिराळा तालुक्यातील पुनवत: सागाव येथे शेतीत एक वेगळाच प्रयोग करण्यात आला आहे. सागाव येथील प्रगतिशील शेतकरी शशिकांत रंगराव पाटील (Farmer Shashikant Patil) यांनी शेतात ‘ब्लॅक राईस’ (Black rice) जातीच्या भाताचे पीक घेतले आहे. महत्वाची बाब म्हणजे या भाताचे बियाणे (Rice seeds) त्यांनी आसाम राज्यातून मागविले आहे. विशेष म्हणजे काळ्या भाताचे पीक घेण्याचा ह जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे.
Shiv Thackeray: “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या”, शिव ठाकरेने केला मोठा खुलासा
या भात पिकाचा (rice crop) विषय राज्यभर चांगलाच रंगत आहे. खरतर सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात (Shirala Taluka) खास करून भात शेती केली जाते. महत्वाची बाब म्हणजे शशिकांत पाटील हे नेहमीच नवनवीन प्रयोग आपल्या सात एकर शेतीत करत असतात. दरम्यान यंदाच्या वर्षी खरीप हंगामात पारंपरिक भात बियाणांपेक्षा नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी मित्रांच्या साहाय्याने आसाममधून ब्लॅक राईस हे 200 ते 250 रुपये किलो असलेले महागडे बियाणे मागविले.
एसटी महामंडळ रीलस्टार लेडी कंडक्टरसमोर झुकले, अखेर मंगल गिरी यांचे निलंबन मागे
शशिकांत पाटील यांनी 23 मे रोजी ढोलेवाडी रस्त्यालगत असलेल्या शेतात या काळ्या भाताची पेरणी केली. तर त्यांनी जुलै महिन्यात पेरणीतून उगवलेल्या रोपांतून बाजूच्या दुसऱ्या क्षेत्रात रोपलागण केली. त्यामुळे पेरणी केलेल्या पिकापेक्षा लागणीचे पीक अधिक चांगले आहे. दरम्यान या पिकासाठी त्यांनी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा वापर केला आहे. सध्याच्या परिस्थितीत या काळ्या भाताचे पिक परिपक्व होत आलेले आहे. तसेच या भाताची लाबी आणि आतील तांदूळ काळ्या रंगाचा आहे.
चक्क घराची भिंत पाडताना सापडली तब्बल 160 हून अधिक चांदीची नाणी, पुढे झालं अस की…
महत्वाची बाब म्हणजे हे पीक इतर भात पिकापेक्षा जवळजवळ चार-साडेचार फूट उंचीचे झाले आहे. खरतर हा तांदूळ खाण्यास पौष्टिक आणि आरोग्यवर्धक आहे. तसेच या तांदळाला शिजण्यास वेळ लागत असून तो पौष्टिक असतो. विशेष म्हणजे शिराळा तालुक्यातील पोषक वातावरणात हा काळा भाताचा प्रयोग यशस्वी ठरत आहे.यासोबतच या पिकातून चांगले उत्पन्न मिळेल.तसेच या तांदळाची किंमत ही जास्त आहे. उत्पादक शेतकऱ्याला ही चांगला नफा मिळवून देते,असा विश्वास शेतकरी शशिकांत पाटील यांना आहे.
दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये मुलीचा दोरीच्या उडीचा पराक्रम, पाहा व्हायरल VIDEO