Urfi Javed : “आय लव्ह यू पारस ”, उर्फी जावेद पुन्हा एक्स बॉयफ्रेंडच्या प्रेमात?; समोर आले व्हिडिओ आणि फोटो

“I Love You Paras”, Urfi Javed In Love With Ex Boyfriend Again?; Videos and photos surfaced

मुंबई : सध्या उर्फी जावेद तिच्या ‘हाय हाय ये मजबूरी…’ या म्युझिक व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. उर्फी नेहमीच तिचे अतरंगी फोटो आणि व्हिडीओ इन्स्टग्रामावर शेअर करताना दिसते. बऱ्याचवेळा उर्फीच्या फोटोंमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. पण उर्फी ही बिनधास्त मुलगी असून ती या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देण्यासही मागे पुढे पाहत नाही. दरम्यान अशातच उर्फीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला आहे.

23 वर्षीय दिव्यांग तरुणीवर किशोरवयीन मुलाचा दोन दिवस बलात्कार

या फोटोमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उर्फी जावेदचा 15 ऑक्टोबरला वाढदिवस (birthday party) असतो. दरम्यान दोन दिवस आधीच उर्फीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. उर्फीने या सेलिब्रेशनचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या सेलिब्रेशनवेळी उर्फीचा एक्स बॉयफ्रेंड पारस कलनावत(Paras Kalnawat) देखील उपस्थित होता.

“मुरजी काकांचे आमच्यावर खूप उपकार..”, टाईमपास’फेम दगडूचे भाजपच्या मुरजी पटेलांच्या रॅलीत वक्तव्य

पारसने उर्फी जावेदचा केक कापतानाचा व्हिडीओ (video) सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये उर्फी रडताना दिसली होती. व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिलं आहे की, “अरे अरे असं कोण रडतं? मी तर 15 तारखेलाही तुला शुभेच्छा देणार आहे.” दरम्यान उर्फीने पारसची ही पोस्ट शेअर करताना लिहिलं की, “आय लव्ह यू पारस”.(I Love you Paras)..उर्फी जावेदच्या प्री-बर्थ पार्टीमधील व्हिडीओ आणि फोटोत अंजली अरोरा आणि पारस कलनावत तसेच उर्फीचे भाऊ बहीणही दिसले होते. उर्फीच्या मित्रपरिवाराने तिचा 3 दिवस आधीच तिचा वाढदिवस साजरा केला आहे.

Abdu Rozic: सुप्रसिद्ध गायक ए आर रहमान देखील आहेत त्याचे फॅन ‘तो’ अब्दू रोझिक नक्की आहे तरी कोण?

दरम्यान, खासकरून या पार्टीमध्ये एक्स बॉयफ्रेंड पारस कलनावतने येणं आणि उर्फीसह फोटो शेअर करणं सर्वांसाठी आश्चर्याची बाब होती. कारण पारस आणि उर्फी जावेदची ओळख ‘दुर्गा’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. दरम्यान याच सेटवर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं होतं. दोघेही एकमेकांना बरेच वर्ष डेट करत होते. मग 2017 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतर या दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केले होते. दरम्यान आता पुन्हा एकादा त्या दोघांना एकत्र पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

“नोकरी नाही मिळाली म्हणून…”, बी कॉम इडलीवाल्याची प्रेरणादायक कथा; वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *