मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्य लोकांना झटका. अमूल दूध (Amul milk) दरामध्ये प्रती लिटर दोन रूपयांची वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर डाळी, तेल याचे तर भाव वाढलेच पण आता दुधाचे देखील भाव वाढणार आहेत. दुधाचे भाव वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होणार ऊस परिषद, ऊस उत्पादकांचे राजू शेट्टींच्या घोषणेकडे लागले लक्ष
अमुलच्या एक लिटर दुधासाठी सध्या ६१ रूपये द्यावे लागत होते आता यांनतर एक लिटर दुधासाठी ६३ द्यावे लागणार आहेत. अमूलने आजपासून ही दरवाढ लागू केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
मेडिक्लेम पॉलिसी करणं ठरलं गरजेचं
दरम्यान, डाळी, तेल या खाद्यपदार्थांचे देखील भाव वाढले आहेत. आणि आता दुधाचेही भाव वाढल्यामुळे महागाईने ग्राहकांना झळा सहन कराव्या लागणार आहेत. तरी या दरवाढीमुळे शेतकरी आणि दूधउत्पादक यांना याचा कोणताही फायदा होणार नाही. झालेली दरवाढ ही विक्री दरवाढ आहे खरेदीदर वाढलेल नाहीत.
23 वर्षीय दिव्यांग तरुणीवर किशोरवयीन मुलाचा दोन दिवस बलात्कार