भारतासाठी आता चिंतेचा विषय ठरतोय तो म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्सचा (Global Hunger Index) ताजा अहवाल. या अहवालानुसार जगातील 121 देशांच्या यादीत भारत (India) हा 107 व्या क्रमांकावर आहे. सर्वसाधारपणे ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) हे जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूकेचे सर्वसमावेशक मोजमाप (measurement) आणि मागोवा घेण्यासाठीचे एक साधन आहे. तसेच ग्लोबल हंगर इंडेक्स स्कोअरची गणना 100-पॉइंट स्केलवर केली जाते. दरम्यान यावरून प्रत्येक देशातील भुकेची तीव्रता दर्शवली जाते. या तीव्रतेत शून्य हा सर्वोत्तम स्कोअर (score) असतो. तर 100 हा सर्वात वाईट स्कोअर मानला जातो. महत्वाची बाब म्हणजे ग्लोबल हंगर इंडेक्सच्या ताज्या स्कोअरनुसार भारताचा स्कोअर 29.1आहे. हा स्कोअर देशाच्यादृष्टीने गंभीर मानला जात आहे.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन टप्प्यात वितरित होणार चार हजार कोटी रुपये, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय
भूकस्थिती निर्देशांकात भारताच्या शेजारील देशांची परिस्थिती चांगली आहे. यामध्ये श्रीलंका 64, नेपाळ 81 आणि पाकिस्तान 99 व्या स्थानावर आहे. दरम्यान दक्षिण आशियातील एकमेव देश म्हणजे अफगाणिस्तान हा देश 109 व्या क्रमांकावर आहे. तसेच येथील भूक संकट भारतापेक्षाही गंभीर आहे. तर दुसरीकडे चीनचा भूकस्थिती स्कोअर 5 पेक्षा कमी आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेपेक्षाही भारताची स्थिती भीषण असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान 2021 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यादीत भारत 101 व्या स्थानावर होता. परंतु दुर्दैवाने यावर्षीच्या आकडेवारीनुसार त्यामध्ये आणखीन सहा अंकांची घसरण झाली आहे.
Rohit Pawar: बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पुढं यावं – रोहित पवार
भारतातील कुपोषित लोकांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. कारण 2018-2020 मध्ये 14.6 टक्क्यावर होती. दरम्यान हीच आकडेवारी 2019-2021 या तीन वर्षात 16.3 टक्क्यांवर नोंदवली गेली आहे. म्हणजे यातून स्पष्ट होतय की भारतातील 224.3 दशलक्ष लोक कुपोषित आहेत. तर एकूण 828 दशलक्ष लोक जागतिक स्तरावर कुपोषित आहेत. पण दुसरीकडे चांगली गोष्ट म्हणजे जरी भारताची स्थिती भूकेच्या बाबतीत गंभीर असली तरी 2014 ते 2022 दरम्यान बालमृत्यूचे प्रमाण 38.7 टक्क्यांवरून 35.5 पर्यंत कमी करण्यात भारताला यश आले आहे.
अमूल दूध दरात प्रतीलिटर ‘इतक्या’ रूपयांनी वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना महागाईचा झटका!