मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचले ‘वर्षा’ बंगल्यावर, ‘या’ विषयावर झाली चर्चा

MNS President Raj Thackeray reached the 'Varsha' bungalow to meet the Chief Minister, there was a discussion on 'this' issue

मुंबई : आज 15 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalowí) भेट घेतली. या विशेष बैठकीचे आयोजन आरोग्य (health) विषयावर चर्चा करण्यासाठी करण्यात आलं आहे. तसेच या विशेष बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभाच लोढा हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या भेटीचा फोटो देखील समोर आला आहे.

India: भारताची स्थिती भूकेच्या बाबतीत पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षाही गंभीर, वाचा सविस्तर

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता

महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. खरतर या भेटीचं प्रमुख कारण आरोग्यविषयक मुद्दे असले तरी या बैठकीत राजकीय चर्चा होणार नाही, असं शक्यच नाही. तसेच पुढील महिन्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणुका आल्या आहेत. त्यामुळे या बैठकीत आरोग्यविषयक चर्चेसोबतच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबतही राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजप आणि शिंदे गटाच्या युतीला पाठिंबा देणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे.

मनाला सुन्न करणारी घटना, रुग्णालयाच्या छतावर सापडले 500 मृतदेह; शरीराचे अवयवही झाले गायब

दोन महिन्यात तिसऱ्यांदा भेट

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या दोन महिन्यात तिसरी भेट आहे. पाहिली भेट ही एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. दुसरी भेट ही राज ठाकरे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. आणि आत्ता तिसरी भेट ही वर्षा बंगल्यावर आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी घेतली.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन टप्प्यात वितरित होणार चार हजार कोटी रुपये, शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *