‘या’ जिल्ह्यातील दोन तरुणांनी यूट्यूबवरुन घेतले शेतीचे ज्ञान, वर्षातच घेतायत लाखोंचे उत्पादन

Two youths of 'Ya' district learned about agriculture from YouTube, they are producing lakhs of rupees within a year

जालना: जिल्ह्यातील घनसावंगी येथील दोन तरुण शेतकऱ्यांनी (farmers)इं टरनेटवरून माहिती घेऊन शेती केली. दरम्यान त्याच शेतीतून त्यांना घवघवीत यश मिळाले आहे. आपला सगळ्यांचा असा समज झाला होता की इंटरनेट व सोशल मीडियाचे (Social media) व्यसन लागल्याने आजची युवापिढी भरकटत चालली. पण जालन्याच्या या दोन तरुण शेतकऱ्यांनी हा समज फेटाळून लावला आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी रामेश्वर कोंडीबा वायसे (Rameshwar wayse) आणि काशिनाथ शेंबडे (Kashinath Shembde) या दोन तरुणांनी यूट्यूबवरुन (YouTube) आधुनिक शेतीचे धडे घेतले.

शेतकऱ्यांनी शेतातच केलं अर्धनग्न आंदोलन, केली ‘ही ‘ मागणी

दरम्यान, स्वत:च्या शेतात यशस्वी प्रयोग करुन दाखविला आहे. आता या शेतीतून त्यांना वर्षाकाठी लाखों रुपयांचे उत्पादन मिळण्याचा मार्गही खुला झाला आहे. घडल असं की रामेश्‍वर व काशिनाथ या दोन्ही तरुणांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचा पाठलाग सुरु केला. परंतु त्यांना नोकरीत पाहिजे तस यश मिळाले नाही. म्हणून त्या दोघांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. पण शेती साध्या पद्धतीने नाही तर शेतीत काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं दोघांनी ठरवलं.

आता शेततळ्यासाठी मिळणार १०० टक्के अनुदान, पण त्यासाठी करावं लागणार ‘हे’ काम

दरम्यान त्या दोघांनी यूटयूब वर शेतकर्‍यांचे आधुनिक शेती, फळशेती, फुलशेती वरील नवनवे प्रयोग पाहिले. त्यावरून त्यांनी आपल्या शेतीच्या मानाने करण्याजोगा प्रयोग म्हणून ड्रॅगन फ्रुट शेतीला त्यांनी पसंती दिली. पुढे त्यांनी ड्रॅगन फ्रुट (Dragon fruit) शेतीमध्ये यशस्वी झालेल्या शेतकर्‍याचा शोध त्यांनी सुरु केला. त्याचवेळी त्यांना सांगोला भागातील ड्रॅगन फ्रुटचे यशस्वी उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांची माहिती मिळाली. त्यांनी त्या शेतकऱ्याची भेट घेवून ड्रॅगन फ्रुट लागवडीची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

अखेर पोलीस भरतीचा GR निघालाचं, राज्यात तब्बल 11 हजार 443 पदांच्या भरतीस मंजुरी

माहिती घेतल्यानंतर रामेश्वरने स्वत:च्या १ एकर तर काशिनाथने दीड एकर मुरमाड जमिनीत रेड जंबो जातीच्या ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग करून पाहिला. मग काय एक वर्षानंतर तो प्रयोग यशस्वी झालाय. त्यांनी एक एकरमध्ये ५०० पोल उभारले असून प्रती पोल ४ रोपं अशी रेड जंबो या जातीची २ हजार रोपे सांगोल्याहून विकत आणली. दरम्यान ४० रुपये एका रोपाच्या किमीप्रमाणं २ हजार रोपं शेतापर्यंत आणण्यासाठी त्यांना वाहतुकीचा खर्च ३५ हजार रुपये झाला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहचले ‘वर्षा’ बंगल्यावर, ‘या’ विषयावर झाली चर्चा

इतकंच नाही तर रेड जंबो जातीचे रोप, शेतात लावण्यासाठी पोल, पोलवरील रिंग, शेतीची मशागत व रोप लावणीसाठी जमीन बनवण्या पर्यंतचा खर्च, वाहतूक खर्च, कामगारांची मजुरी असा सुमारे ४ लाखापर्यंत खर्च आला. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात त्यांना भरघोस उत्पादन मिळाल्यामुळे त्यांचा खर्च निघून कमाईला सुरुवात झाली आहे. दरम्यान सध्या त्यांचे ड्रॅगन फ्रूट १४० ते १७० रुपये किलोच्या भावाने काही व्यापारी विकत घेत आहे. त्यामुळे आता त्या दोघांना उत्पन्नाची हमी मिळू लागली आहे. तसेच यावर्षी त्यांना दीड टन पर्यंत तर पुढच्या वर्षी ५ टन पर्यंत उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.

India: भारताची स्थिती भूकेच्या बाबतीत पाकिस्तान, श्रीलंकेपेक्षाही गंभीर, वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *