हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेल्यामुळे 24 तासात 2 शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

2 farmers committed suicide in 24 hours as their crops went into water

बीड : राज्यात परतीच्या पावसाने (haivy rain) मागच्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांत या पावसाने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर परतीच्या पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारो हेक्टर शेतजमीन (agriculture) पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी (crop failure) झाली आहे. अतोनात नुकसान (damage) झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! आता ई-पीक पाहणीसाठी ‘या’ तारखेपर्यंत वाढली मुदत

दरम्यान याच परिस्थितीत आता बीडमधून अतिशय हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. बीड (Beed) जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात एका मागोमाग आत्महत्यांचं सत्र सुरू झालं आहे .दरम्यान गेल्या 24 तासात बीडमध्ये 2 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! अखेर 5 हजार कंत्राटी एसटी चालकांच्या भरतीची योजना रद्द

केज तालुक्यातील राजेगावमधील तरूण शेतकरी संतोष अशोक दौंड यांनी काल गळफास घेत आत्महत्या केली होती. त्या घटनेला 12 तास होतात की नाही तोच दुसरी आत्महत्येची घटना समोर आली. दरम्यान आता बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब बाबुराव वांढरे यांनी गळफास घेवून मृत्यूला कवटाळलं आहे. दादासाहेब वांढरे यांच्याकडे तीन ते चार एकर जमीन आहे. परंतु अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी झाली.

बंद फाईल पुन्हा उघडली! शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीकडून अजित पवारांची चौकशी होणार

या सोबतच शासनानेदेखील कुठलीच मदतीची घोषणा केली नाही. तसेच पिकविमा मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. मदत मिळालीच नाही तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? पिकासाठी घेतलेलं लोकांचं देणं कसं द्यायचं? या चिंतेत त्यांनी शेतातील शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दादासाहेब वांढरे यांच्या पश्चात एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे.

काय सांगता? ‘या’ गावात चक्क माकडांच्या नावावर आहे 32 एकर जमीन

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *