फलटण : रात्री रात्रभर प्रचंड पाऊस झाला आहे त्यामुळे फलटण तालुक्यातील बिबी या गावातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये तळ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचबरोबर स्त्याच्या कडेला देखील पाण्याचे प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहतांना दिसत आहे.
दूध खरेदी दरामध्ये वाढ! ‘या’ दूध संघाने दिली दूध उत्पादकांना दिवाळी भेट
शेतकऱ्यांची तोंडाशी आलेली पिके पाणयात बुडाली आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने लवकरात लवकर या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आयएएस अधिकाऱ्याने 21 वर्षीय महिलेला नोकरीचे आश्वासन देत केले ‘हे’ कृत्य
काल रात्री गावात खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्याची पिके पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. कांदा, मका, घेवडा, सोयाबीन, यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत