‘या’ पिकाची करा शेती, हमखास मिळेल बंपर उत्पन्न

Cultivate 'this' crop, you will get bumper income for sure

जिरेनियम (Geranium) पिकाची आपण जमिनीमध्ये वर्षभर कधीही लागवड करू शकतो. विशेष म्हणजे या वनस्पतीची एकदा लागवड केली तर ती तीन वर्ष उत्पादन (product) मिळते. तसेच एका एकरमध्ये 10,000 हजार रोप लागतात. दरम्यान हे पिक (crop) एका वर्षात तीन वेळा कापणीला येते. या पिकासाठी एका एकरला सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो. इतकंच नाही तर इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75% खर्च कमी आहे. या पिकापासून ऑईल निर्मिती व पीक कापणी नंतर उरलेल्या पालापाचोळ्या पासून खत निर्मिती केली जाते. जिरेनियम पिकाची शेती करताना एका एकरला पाच ते सहा ट्रॉली शेणखत वापरणे गरजेचे आहे.

मुसळधार पावसाने पुण्यात घातला राडा, पाण्यात अडकलेल्या 12 जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

या पिकाला रासायनिक खतांची गरज नसते. त्यामुळे आपण जेवढे शक्य होईल तेवढेच शेणखत वापरणे गरजेचे आहे. जिरेनियम पिकाची जेवढी वाढ होईल तेवढे आपले उत्पादन जास्त येते. यासाठी शेणखत जमिनीमध्ये मिसळून मे महिन्यामध्ये हलक्‍या जमिनीसाठी तीन फूट व भारी जमिनीसाठी चार फूट अंतरावर उसाच्या सरी प्रमाणे रुंद सरी काढून घ्यावी. त्या सरीवर ड्रिप अंथरून हलक्या जमिनीमध्ये एक फुटावर व भारी जमिनीमध्ये दीड फुटावर जिरेनियम रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर त्याला कोणतेही रासायनिक खत देऊ नये.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना ह्रदयविकाराचा झटका, मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू

जिरेनियम ची लागवड ही जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. त्यामुळे रोप व्यवस्थित सेट होते.दरम्यान पिकाच्या पहिल्या कटिंगची वेळ ही ऑक्टोबर महिन्यामध्ये येते.कटिंग झाल्यानंतर व बुरशीनाशकांची फवारणी करून जमिनीमध्ये जिवाणूजन्य बुर्शिनाशक सोडावे.दरम्यान या पिकासाठी वर्षभरामध्ये कोण कोणती खते व औषधांचा वापर करायचा आहे.तसेच या पिकाला ज्यांच्याकडून प्लांट मिळतात त्यांच्याकडून माहिती मिळते. विशेष म्हणजे या जिरेनियममध्ये कोणत्याही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

‘सैराट’मधील लंगड्या आणि सल्या दिसणार ‘या’ चित्रपाटाच्या मुख्य भूमिकेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *