पुणे : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची धांदल उडाली आहे. अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामध्ये पुण्यातील (Pune) मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाच्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्हांमध्ये मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली आहे.
लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीच कृत्य पाहून नवरा अजूनही शॉकमध्ये, कारण…
मागच्या दोन दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे त्यामुळे पुणे शहरातील नागरिकांचे हाल झाले आहेत. पुराचे पाणी घरात शिरून गोरगरीब नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यावर मोठमोठी झाडे पडली आहेत. यामुळे जीवितहानी देखील झाली आहे. पावसाच्या पाण्यामध्ये लोकांच्या गाड्या देखील वाहून गेल्या आहेत.
‘या’ पिकाची करा शेती, हमखास मिळेल बंपर उत्पन्न
दरम्यान शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची तोंडाशी आलेली पिके पाण्यात बुडाली आहेत यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने लवकरात लवकर या पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. . कांदा, मका, कपाशी, सोयाबीन, यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
थरारक घटना, पुराच्या पाण्यात कारसह बाप लेकीवर काळानं घाला घातला