शेतकरी शेतीत अशी पिक घेतात ज्यातून जास्त उत्पन्न मिळेल. दरम्यान आता शेतकरी जास्तीत जास्त भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतात. या भाजीपाला पिकामध्ये भेंडी या पिकाची लागवड महाराष्ट्रमध्ये फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. कारण भेंडी या पिकाला वर्षभर चांगल्यापैकी बाजारपेठेत दर मिळतात. जर आपण भेंडी या पिकाचा विचार केला तर हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.
अरे हे काय घडलं? पोलिसांना दंड घेण्याऐवजी भरावा लागला भुर्दंड; वाचा पुण्यातील किस्सा
महत्वाची बाब म्हणजे भेंडीच्या बियाण्याची उगवण चांगली व्हावी यासाठी 20 ते 40 अंश सेल्सियस तापमान असणे गरजेचे आहे. तसेच जर 10 अंश सेल्सिअसपेक्षा तापमान कमी असेल तर भेंडीची उगवण चांगली होत नाही. हीच महत्वाची बाब आहे ज्यामुळे हिवाळ्यात भेंडीची लागवड जास्त प्रमाणात होत नाही .भेंडी हे शेतकऱ्यांसाठी असे एक महत्वपूर्ण पीक आहे जो शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. भेंडीच्या काही मोजक्या जाती आहेत ज्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते.
कमी कालावधीत शेवग्याच्या ‘या’ दोन जाती देतात जास्त उत्पादन, मिळतोय बक्कळ नफा
भेंडीच्या वेगवेगळ्या जाती
1)पुसासावनी भेंडी- ही भेंडीची जात आय.ए.आर.आय.ने विकसित केली आहे. दरम्यान या जातीची भेंडीची लांबी 10 ते 15 सेंटिमीटर व हिरवी मुलायम असते. या भेंडीच्या झाडावर काटेरी लव असते. तसेच भेंडीच्या देठावर तांबूस छटा असतात. पण या भेंडीचे वाण सध्या व्हायरसला बळी पडत आहे. या भेंडीच्या वाणातून हेक्टरी आठ ते दहा टन उत्पादन मिळते.
2) परभणी क्रांती भेंडी – ही भेंडीची जात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. दरम्यान या जातीची फळे सात ते दहा सेंटिमीटर लांब असतात. उन्हाळ्यामध्ये 14 ते 16 तोडे मिळतात तर खरिपात 20 तोडे मिळतात. हेक्टरी सात ते आठ टन उत्पादन मिळू शकते. या जातीपासून मिळणारी भेंडी ही नाजूक व तजेलदार तसेच हिरवेगार असते.
लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीच कृत्य पाहून नवरा अजूनही शॉकमध्ये, कारण…
3)अर्काअनामिका भेंडी – या जातीच्या भेंडीचे झाड उंच वाढते व फळे लांब व कोवळी तसेच हिरवीगार असतात.व्हायरस रोगासाठी प्रतिकारक असून भेंडीची तोडणी करणे देखील सोपे आहे. या जातीची भेंडी हेक्टरी 9 ते 12 टनांपर्यंत उत्पादन देते.
4) वर्षा भेंडी – वर्षा जातीची भेंडी ही लोकप्रिय जात आहे. या जातीची भेंडी पाच ते सात सेंटिमीटर लांब असते. या भेंडीच्या झाडाला लुसलुशीत भेंडी येत असतात. दरम्यान या जातीच्या भेंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भेंडी तोडल्यानंतर काळी पडत नाही. तसेच या जातीच्या भेंडी पासून हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
राज्यात पावसाचा कहर, अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर
5)महिको 10 – महिको 10 या जातीची भेंडी एक सरळ वाढते. तसच या भेंडीच्या झाडाला जास्त फळे व हिरवीगार असतात. महत्वाची बाब म्हणजे महिको 10 जातीच्या भेंडी पासून हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन मिळते.
6) अंकुर 40 – अंकुर 40 या जातीची भेंडी ही सरळ वाढणारी आहे. तसेच या जातीच्या भेंडीच्या पेरामधील अंतर कमी असते व हेक्टरी आठ ते दहा टन उत्पादन देते.
धक्कादायक! श्रीगोंद्यामध्ये घरफोडून 56 हजार रुपयांची मुद्देमाल चोरट्यानी केली लंपास